शिवडी कोळीवाडा येथे श्री.बाळासाहेब ठाकरे दवाखाना आरोग्य केंद्राचे आज लोकार्पण मुंबईच्या महापौर सौ.किशोरीताई पेडणेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
शिवडी पूर्व येथे गेले ४० वर्षांपासून सदर ठिकाणी मनपाचे अधिकृत दवाखाने आरोग्य केंद्र नव्हते. तेथील नागरिकांना २ किमी एवढा अंतर गाठून के.ई.एम तसेच शिवडी नाका येथील आरोग्य केंद्रात यावे लागायचे. तसेच कोरोना सारख्या काळात या विभागात नागरिकांचे खुप हाल झाले एखादा चांगला बी.एम.एस.डाॅक्टर देखील या विभागात नव्हता. सदर बाब स्थानिक नगरसेवक श्री.सचिन पडवळ यांच्या लक्षात येताच स्थानिक नगरसेवक श्री.सचिन पडवळ यांनी शिवडी पूर्व विभागात आरोग्य केंद्र उभारण्यात यावे असा प्रस्ताव मुंबई मनपाला दिला होता त्यानंतर या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली तसेच मनपा अधिकारी वर्ग यांच्यासोबत मिटिंग झाली कित्येकदा पाहणी केली आणि आज या सगळ्या मेहनतीचे फळ सदर ठिकाणी शिवडी कोळीवाडा येथे श्री.बाळासाहेब ठाकरे दवाखाना आरोग्य केंद्राचे आज लोकार्पण करण्यात आले.
सदर आरोग्य केंद्राचे उद्घाटन मुंबईच्या महापौर सन्माननीय सौ.किशोरीताई पेडणेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
🩺दवाखान्यात असलेल्या सुविधा🩺
🔹४ AC कंटेनर असलेला दवाखाना
🔹एम.बी.बी.एस. डाॅक्टर
🔹कंपाऊंडर आरोग्य सेविका इतर कर्मचारी
🔹मनपा शेड्युल वर असलेली मोफत औषधे
🔹ओ.पी.डी. व रक्ततपासणी
🔹मोफत समुपदेशन
🔹लहान मुलांचे लसीकरण (० ते ५ वय)
या उद्घाटन वेळेस शिवसेना खासदार अरविंद सावंत साहेब तसेच खासदार राहुल शेवाळे साहेब तसेच आमदार अजय चौधरी साहेब, विभागप्रमुख आशिष चेंबुरकर साहेब, उप विभागप्रमुख गजानन चव्हाण, महिला विधानसभा संघटक लता रहाटे, माजी नगरसेविका श्वेता राणे, शाखा समन्वयक समिक्षा परळकर, शाखाप्रमुख बैजू हिंदोळे, शाखा संघटक शुभदा पाटील उपस्थित होते.
तसेच मला या आरोग्य केंद्रासाठी विशेष असे मोलाचे सहकार्य लाभले ते म्हणजे आपले मनपाचे
श्री.गजानन बेल्लाळे - सहाय्यक आयुक्त
डाॅ.मंगला गोमारे - कार्यकारी आरोग्य अधिकारी
डाॅ.दक्षा शहा - उप कार्यकारी आरोग्य अधिकारी
डाॅ.इनामदार - वैद्यकीय आरोग्य अधिकारी
प्रशांत बने - सहाय्यक अभियंता
⛳!! शिकवण आहे शिवसेनेची !!🏹
जाण आहे कर्तव्याची
🩺!! वचनपूर्ती आरोग्यकेंद्राची !!💉
Comments
Post a Comment