के.ई.एम. रूग्णालयात मागील आठवड्यात हाताचे प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली.....
आपल्या भारत देशाच्या इतिहासात प्रथमच मुंबई महानगरपालिकेच्या पालिका रुग्णालयात म्हणजेच आपल्या विभागातील परळ येथील के.ई.एम. रूग्णालयात मागील आठवड्यात हाताचे प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली.
ग्रँटरोड येथील वाॅकहार्ट रुग्णालयात एका रुग्णाच्या प्रकृतीत कोणत्याच प्रकारची सुधारणा दिसत नव्हती तसेच काही दिवसांपूर्वीच त्याचे ब्रेनडेड देखील घोषित केले. त्यावेळेस त्याच्या कुटुंबियांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत त्या रुग्णाचे अवयव दान करण्याचे ठरवले.
के.ई.एम. मधील असलेल्या रूग्णाला येथील डाॅक्टरांनी हाताचे पहिले असे प्रत्यारोपण केले. एखाद्या खराखुरा हातासारखा हात या डाॅक्टरांनी बसविला. तसेच त्या ब्रेन डेड रुग्णाने आपले यकृत, किडनी, त्वचा, फुप्फुस आणि काॅर्निया देखील दान केले आहे आणि के.ई.एम. मध्ये त्याची किडनी देखील दुसर्या एका रूग्णाला बसविण्यात आली आहे.
हाताचे प्रत्यारोपण करण्यासाठी २४ तास लागतात. या प्रत्यारोपणात २ मुख्य धमन्या, ६ शिरा, ८ नसा आणि १२ टेंडन्स व हाडे जोडली जातात.
या प्रत्यारोपणात कौतुकास्पद कामगिरी करणारे
डाॅ. विनिता पूरी, डाॅ. इंद्रानी चिंचोली, डाॅ. तुकाराम जमाळे या सर्वांचे विशेष सत्कार मुंबई महापौर मा. किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळेस स्थापत्य समिती अध्यक्ष दत्ता पोंगडे, स्थापत्य समिती उपाध्यक्ष सचिन पडवळ, नगरसेविका सिंधुताई मसुरकर, के.ई.एम. चे डीन डाॅ. हेमंत देशमुख सर तसेच डाॅ. प्रवीण बांगर उपस्थित होते. सर्व डाॅक्टर्स व त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन आणि शुभेच्छा...
काळ वेळ न पाहता जे होतात रूग्णसेवेत रुजू !!
सांगा डाॅक्टर तुमचे उपकार कोणत्या शब्दात मोजू !!
Comments
Post a Comment