Posts

भाजपकडे माथा टेकवण्यायोग्य नेत्याचे स्मारक नसणे हा संघाच्या विचारधारेचाच पराभव...!

केंद्रीय मंत्री नामदार नारायण राणेंनी आपल्या जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात हिंदुह्रुदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावर माथा टेकवून केली. त्यानंतर शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडुन व दुधाचा अभिषेक करून स्म्रुतीस्थळाच्या जागेचे शुद्धीकरण केले. स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण करणाऱ्या शिवसैनिकांची कृती म्हणजे एकप्रकारे बुरसटलेली तालिबानी मानसिकता आहे, अशी टिका माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. शिवसेनेवर टिका करताना देवेंद्र फडणवीस एक गोष्ट विसरले की जनआशीर्वाद यात्रा हा सरकारी कार्यक्रम नसुन भारतीय जनता पक्षाचा पक्षीय कार्यक्रम आहे. बाळासाहेब ठाकरे हे जरी हिंदुह्रुदयसम्राट असले तरी ते शिवसेनाप्रमुख आहेत, ही गोष्ट राजकारणात विसरून चालणार नाही. एरव्ही निव्वळ श्रद्धेपोटी कोणत्याही पक्षाच्या नेत्याने शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरेंच्या स्म्रुतीस्थळावर आदराने माथा टेकवणे किंवा नतमस्तक होणे यात काहीही वावगे नाही. त्यावर शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याला किंवा अगदी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाही आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही. मात्र जनआशीर्वाद यात्रा या भारतीय जनता पक्षाच्या पक्षीय क...

शिवडी कोळीवाडा येथे श्री.बाळासाहेब ठाकरे दवाखाना आरोग्य केंद्राचे आज लोकार्पण मुंबईच्या महापौर सौ.किशोरीताई पेडणेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

शिवडी पूर्व येथे गेले ४० वर्षांपासून सदर ठिकाणी मनपाचे अधिकृत दवाखाने आरोग्य केंद्र नव्हते. तेथील नागरिकांना २ किमी एवढा अंतर गाठून के.ई.एम तसेच शिवडी नाका येथील आरोग्य केंद्रात यावे लागायचे. तसेच कोरोना सारख्या काळात या विभागात नागरिकांचे खुप हाल झाले एखादा चांगला बी.एम.एस.डाॅक्टर देखील या विभागात नव्हता. सदर बाब स्थानिक नगरसेवक श्री.सचिन पडवळ यांच्या लक्षात येताच स्थानिक नगरसेवक श्री.सचिन पडवळ यांनी शिवडी पूर्व विभागात आरोग्य केंद्र उभारण्यात यावे असा प्रस्ताव मुंबई मनपाला दिला होता त्यानंतर या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली तसेच मनपा अधिकारी वर्ग यांच्यासोबत मिटिंग झाली कित्येकदा पाहणी केली आणि आज या सगळ्या मेहनतीचे फळ सदर ठिकाणी शिवडी कोळीवाडा येथे श्री.बाळासाहेब ठाकरे दवाखाना आरोग्य केंद्रा चे आज लोकार्पण करण्यात आले. सदर आरोग्य केंद्राचे उद्घाटन मुंबईच्या महापौर सन्माननीय सौ.किशोरीताई पेडणेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 🩺दवाखान्यात असलेल्या सुविधा🩺 🔹४ AC कंटेनर असलेला दवाखाना 🔹एम.बी.बी.एस. डाॅक्टर  🔹कंपाऊंडर आरोग्य सेविका इतर कर्मचारी  🔹मनपा शेड्युल वर असलेली मो...

के.ई.एम. रूग्णालयात मागील आठवड्यात हाताचे प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली.....

आपल्या भारत देशाच्या इतिहासात प्रथमच मुंबई महानगरपालिकेच्या पालिका रुग्णालयात म्हणजेच आपल्या विभागातील परळ येथील के.ई.एम. रूग्णालयात मागील आठवड्यात हाताचे प्रत्यारोपण  करण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. ग्रँटरोड येथील वाॅकहार्ट रुग्णालयात  एका रुग्णाच्या प्रकृतीत कोणत्याच प्रकारची सुधारणा दिसत नव्हती तसेच काही दिवसांपूर्वीच त्याचे ब्रेनडेड  देखील घोषित केले. त्यावेळेस त्याच्या कुटुंबियांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत  त्या रुग्णाचे अवयव दान करण्याचे ठरवले. के.ई.एम. मधील असलेल्या रूग्णाला येथील डाॅक्टरांनी हाताचे पहिले असे प्रत्यारोपण केले. एखाद्या खराखुरा हातासारखा हात  या डाॅक्टरांनी बसविला. तसेच त्या ब्रेन डेड रुग्णाने आपले यकृत, किडनी, त्वचा, फुप्फुस आणि काॅर्निया देखील दान  केले आहे आणि के.ई.एम. मध्ये त्याची किडनी देखील दुसर्‍या एका रूग्णाला  बसविण्यात आली आहे. हाताचे प्रत्यारोपण करण्यासाठी २४ तास  लागतात. या प्रत्यारोपणात २ मुख्य धमन्या, ६ शिरा, ८ नसा आणि १२ टेंडन्स व हाडे  जोडली जातात. या प्रत्यारोपणात कौतुकास्पद कामगिरी कर...